पुढील पाच दिवसात राज्यामध्ये या भागात मान्सूनपूर्व पावसाची शक्यता Weather forecast

Weather forecast maharashtra : नमस्कार शेतकरी बंधूंनो, यावर्षी मान्सून हा केरळमध्ये दोन दिवस आधीच हजर झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये सर्व जिल्ह्यात मान्सून दोन दिवस आधीच पोहोचणार आहे. नुकतेच हवामान विभागाचे के एस होसलीकर यांनी हवामाना संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती दिली याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत.

हवामान विभागाने राज्यांमध्ये कोकण, मध्ये महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गड -गडाटीचा चा पाऊस पडेल असा अंदाज दर्शविला आहे. हवामान खात्याने येत्या पाच दिवसांमध्ये दोन जून पासून ते सात जून पर्यंत पावसा संदर्भात अंदाज वर्तविला आहे

येत्या पाच दिवसांमध्ये कोकण, गोवा मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भामध्ये रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे,

पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्र मध्ये सक्रिय होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिलेली आहे. नुकतेच केरळमध्ये मान्सूनचे आगमन झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये मान्सूनची तारीख ही पाच जून ठरवली होती पण ती आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखवणार आहे अशी माहिती दिलेली आहे.

WhatsApp Widget WhatsApp Icon व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment